प्रभाग 9 मधून 1111 दुरडीचा गारवा अन् मानाचे तोरण

इचलकरंजी :-विजय मकोटे
दि:-१० येथील कॉ. के. एल. मलाबादे चौक येथील श्री शंभुतीर्थ याठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधील समस्त नागरिकांच्या वतीने 1111 दुरडीचा गारवा नेत मानाचे तोरण अर्पण करण्यात आले.या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात वेताळ पेठ वेताळ देवास माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढत्त्वून करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रशांत नवनाळे, रमेश कबाडे, राजेश रजपुते, रत्नमाला गांधी, सोमा वाळकुंजे, मनोहर ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वेताळपेठ येथून महात्मा गांधी पुतळा व मुख्य मार्गावरुन श्री शंभूतीर्थ याठिकाणी झांजपथक अन् बेंजोचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि हलगीच्या कडकडाटात 1111 महिला दुरडीचा गारवा, मंगल कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
श्री शंभूतीर्थ परिसरात आगमन झाल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यामुळे संपूर्ण परिसर शंभुमय बनुन गेला होता.  श्री शंभूतीर्थ येथे दिपक केंगार, रुबेन आवळे व मान्यवरांच्या हस्ते तोरण बांधण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन चंद्रकांत कोष्टी यांनी केले. यावेळी मुकूंद पोवार, रुबेन आवळे, अरुण आवळे, सुमन पोवार, शकुंतला मुळीक, मीना बेडगे, अर्चना कुडचे, संजीवनी पाटील, ध्रुवती दळवाई, सीमा कमते, सपना भिसे, रवी रजपुते, श्रीकांत कांबळे, सदानंद दळवाई, सुहास कांबळे, उदय धातुंडे, प्रदीप भंडारे, नागेश पाटील, आकाश माने, शेखर शिंदे, केतन जावळे यांच्यासह भागातील नागरिक सहभागी झाले होते.