इचलकरंजी : मनोज खेतमार
दि:२७ भाजपा उद्योग आघाडीच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या याच्या मार्गदर्शनाखाली शहरातील किरकोळ विक्रते, दुकाने व व्यापारी वर्गाला कामाच्या वेळेत वाढ करून देण्या बाबत उद्योग आघाडी शहराध्यक्ष प्रितम बोरा याच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले. आपले इचलकरंजी शहर हे औद्योगिक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे शहर म्हणून ओळखले जाते.शहरातील मोठा खरेदीदार वर्ग हा कामगार वर्ग आहे.हा कामगार वर्ग आणि सामान्य नागरिक दीपावली सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी बाहेर पडत आहे.
सर्व साधारण सर्वसामान्य नागरिक आणि कामगार वर्ग हा आपले दिवसभराचे काम आवरून संध्याकाळी उशिरा खरेदी साठी बाहेर पडतो. पण सद्या शहारत लागू केलेले वेळेचे निबर्ध पाहता दुकाने आणि बाजार पेठ बंद झालेले असतात.याचे थेट परिणाम व्यापारी वर्ग आणि व्यावसायिक च्या वर होत आहे.याआधी व्यापारी वर्गाचे कोरोना या महामारी मुळे आर्थिक नुकसानी मध्ये आहे.आणि सद्या चे वेळेचे निर्बंध पाहता व्यापारी वर्गाचे नुकसान आणखी वाढू शकते.
शासनाकडून व्यापारी वर्गाला रात्री 11 पर्यंत वेळ निर्धारित केलेली असून,तरी प्रशासन कडून रात्री १० वाजता बाजारपेठ बंद करण्यास सांगितले जात आहे.असे होऊ नये आणि व्यापारी वर्गाला व्यापार करण्यास मुक्त वेळ देण्यात यावी अशी विनंती करतो आशा प्रकारे निवेदन आज उद्योग आघाडी इचलकरंजी शहर याच्या वतीने प्रांताधिकारी विकास खरातसाहेब, मा.पो.उपअधीक्षक श्री. बी.बी.महामुनी साहेब तसेच मा.अप्पर पो अधिक्षक सौ. जयश्री गायकवाड मॅडम याना देण्यात आले.
सर्व सामान्य जनता आणि व्यापारी वर्गाच्या वतीने नम्र विनंती करतो की हे लागू केलेलं निर्बंध हे सर्व सामान्य व्यापारी ,व्यावसायिक आणि वर्षातुन एकदा येणाऱ्या दीपावली सणाच्या निमित्ताने शिथिल करण्यात यावे, किंवा दिलेले वेळेत वाढ करून द्यावे अशी नम्र विनंती करण्यात आली. यावेळी उद्योग आघाडी इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रितम बोरा, रमेश पोवार, विक्रम राठोड,विजय यादव,निलेश बोरा,जितेंद्र जैन ,मोहित बोरा, आधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.