हतकांगले:प्रतिनिधी
दि :३० चालू गळीत हंगामातील ऊसाला एफ.आर.पी. पेक्षा जास्त म्हणजे रु.२९०५/ एकरक्कमी दर दिला जाईल अशी घोषणा आरोग्य राज्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी केली.
कारखान्याने स्थापनेपासून शेतक-यांच्या ऊसाला नेहमीच आघाडीवर राहून दर दिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारखाना नेहमीच सकारात्मक भूमिका घेत आला आहे. ऊस विकासाच्या अनेक योजना शेतक-यांसाठी राबवित आहे. ऊसाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे. शेतक-यांची प्रगती हेच ध्येय ठेवून कारखान्याची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे शेतक-यांचा कारखान्यावर प्रचंड विश्वास आहे. गेल्या १९ हंगामातील ऊसाला दर देताना सर्वांच्याच पुढे कारखाना राहीला आहे. ऊसाची बिले व तोडणी वाहतूकीची तसेच सर्व प्रकारची देणी कारखान्याने वेळेत आदा केली आहेत.
चालू हंगामातील ऊसाला इतर कारखान्यांच्या पुढे राहून दर देण्याची भुमिका होती. त्याप्रमाणे रखान्याची एफ.आर.पी. रु.२८०५/- एवढी असताना अधिकचा दर म्हणून रु.२९०५/- एकरक्कमी देण्यात येणार आहे. असे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते.