इचलकरंजी: संजय आंबे
दि : 2 नोव्हेंबर ,इचलकरंजी हे जागतिक किर्तीचे वस्त्रोद्योग उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. या स्पर्धात्मक युगात जगाच्या गरजा ओळखून नवनवीन प्रकारची उत्पादने तयार करावीत व त्याची निर्यात करून इचलकरंजीस जागतिक निर्यात केंद्राचा दर्जा मिळवून द्यावा, असे आवाहन करताना महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या श्री चौंडेश्वरी मंदिर व श्री चौंडेश्वरीमाता मूर्ती सजावट स्पर्धा आणि मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रकाश आवाडे यांनी काढले.
महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई या संस्थेतर्फ दसर्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील श्री चौडेश्वरी मंदिर व देवी मुर्ती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. सदर स्पर्धस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षिस समारंभ आमदार प्रकाश आवाडे यांचे हस्ते श्री देवांग मंदिर येथे संपन्न झाला. त्यांचे हस्ते श्री चौंडेश्वरी मंदिर इचलकरंजी (प्रथम), देवांग समाज ट्रस्ट विटा (द्वितीय) व देवांग समाज मंदिर पेठवडगांव (तृतीय) यांना बक्षिसे देण्यात आली.
यावेळी विजेत्यांच्यावतीने सचिन लोले (पेठवडगाव), किरण तारळेकर (विटा), विश्वनाथ मुसळे (इचलकरंजी) यांनी मनोगत व्यक्त करून वस्त्रोद्योगातील अडचणी मांडतानाच समाजाच्या उन्नतीसाठी समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
प्रारंभी स्वागत महासचिव रामचंद्र निमणकर यांनी केले. प्रास्ताविकात अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट असतानाही ऑनलाईन सभा घेतल्या. तसेच चिपळुण, खेड येथील पुरग्रस्तांना मदत, खेळाडूंना मदत, वस्त्रोद्योग भुषण पुरस्कार, मंदिरे व देवमुर्ती सजावट स्पर्धा इत्यादी समाजउपयोगी उपक्रम घेतले. यापुढेही समाज एकीकरणासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. याप्रसंगी बक्षीसासाठी मदत करणारे समाजबांधव राहुल सातपुते, जयेश बुगड, सुर्यकांत लोले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रत्यक्षपणे विटा येथुन यंत्रमाग समितीचे अध्यक्ष किरण तारळेकर, दत्तोपंत चोथे, बाबुराव म्हेत्रे, वडगाव येथुन योगोश तारळेकर, महेश भंडारे, सौ. प्रिया लोले तसेच इचलकरंजी येथील विठ्ठलराव डाके, राजेंद्र सांगले, गजानन होगाडे, मधुकर वरूटे, मुरलीधर निमणकर, मनोहर मुसळे, मिलिंद कांबळे, शिरिष कांबळे, शितल सातपुते, सतिश कोष्टी, मनोज खेमकर, सौ . प्राजक्ता होगाडे उपस्थित होते. ऑनलाइन पध्दतीने कार्य बुलढाणा येथुन राजेश सपाटे, मुंबईहुन गुरूनाथ तिरपणकर, पुण्याहुन दत्तात्रय ढगे तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन व इचलकरंजीमधील अनेक समाजबांधव उपस्थित होते. शेवटी आभार महेश सातपुते यांनी मांडले.