यड्राव,: राम आवळे
दि.६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते.महाविद्यालयातील प्रा. एस.एस. कोथळे (मेकॅट्रॉनिक्स), प्रा. ए.डी. पाटील (मेकॅट्रॉनिक्स), प्रा. एस. ए. शेख (कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) यांचा उत्कृष्ट शिक्षक तर एस. एम. हनमाने, पी.पी. गावडे, एन.ए. बनिजवाडे यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री. बागणे म्हणाले, “शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत त्यांना सक्षम, सुजाण आणि स्पर्धात्मक बनविण्याचे महान कार्य शिक्षक करत असतात. शरद पॉलिटेक्निकमधील शिक्षक व कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या बळावर संस्थेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे.”ते पुढे म्हणाले, “शिक्षकांचे ज्ञान, कर्मचायांची जबाबदारी आणि सर्वांची एकजूट यामुळेच कोणतीही संस्था प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करू शकते. आपल्या संस्थेने जपलेली गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थीहिताची परंपरा हीच आपली खरी ताकद आहे.”
प्राचार्य बी.एस. ताशिलदार, उपप्राचार्य प्रा. पी.एस. चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. दिपाली पाटील, प्रा. अंकिता धड्डे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व डीन, विभागप्रमुख, क्रिडा विभागाचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुजा जुगळे व प्रा. धनश्री लोहार यांनी केले. आभार श्रध्दा सुतार हिने मानले.