इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूलचा इयत्ता दहावी मार्च २०२६ चा सेमी माध्यम व मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एकूण २१७ विद्यार्थ्यांपैकी १०६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. तर ९३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि १८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. फासे वैदिका सुनील व कु. बन्ननावर वेदा शिवानंद यांनी ९७.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. चि. जाधव आयुष मारुती याने ९६.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. मेटे अनन्या गोपीनाथ व कु. रामजगोळ श्रुती मीनल यांनी ९५.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शितलकुमार मणेरेसो, सचिव मा. अनिलकुमार मणेरेसो, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केतकळेसो तसेच संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक बसाडे यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगुळे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. पुष्पा एनगुरे मॅडम, सर्व विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयामार्फत अभिनंदन करण्यात आले.