भारताची जनगणना २०२७ करिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्या प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा पूर्ण

इचलकरंजी: विजय मकोटे

दि.८: जनगणना २०२७ करिता इचलकरंजी शहरासाठी एकुण ४९६ ब्लॉक तयार करणेत आलेले आहेत.

     या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.१६ मे ते दि.१४ जुन २०२६ या कालावधीत घरगणना करणेत येणार असुन याकरिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात एकुण ५११ प्रगणक तसेच ८७ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करणेत आलेली आहे.
आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनगणना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना दिनांक २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत पहिले सत्र, दिनांक २ मे ते ४ मे २०२६ या कालावधीत दुसरे सत्र आणि दिनांक ६ मे ते ८ मे २०२६ या या कालावधीत तिसरे सत्र अशा तीन सत्रात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण या कामी नियुक्त केलेल्या एकुण १० फिल्ड ट्रेनर यांचे मार्फत डी. के. ए. एस. सी. महाविद्यालय, श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद‌यालय, डी.के.टी.ई. इंग्लिश मेडीयम हायस्कुल तसेच बालाजी हायस्कुल या ठिकाणी देणेत येत आहे.
सदर प्रशिक्षणाची सुरुवात सोमवार दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी झालेली असुन या प्रशिक्षण शिबिराचा दुसरा टप्पा शनिवार दि. २ मे ते सोमवार दि. ४ मे या कालावधीत पार पडला. स्लाईडशोच्या माध्यमातून सदर प्रशिक्षण देण्यात आलेले असून प्रशिक्षणाच्या अखेरच्या दिवशी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक आणि प्रगणक यांनी परिसरातील काही घरांमध्ये भेट देऊन जनगणना कामकाजाचे प्रात्यक्षिक घेतले.
यावेळी नंदु परळकर, उपायुक्त शहर जणगणना अधिकारी, रोशनी गोडे, सहा. आयुक्त तथा चार्ज अधिकारी त्याचबरोबर अति. चार्ज अधिकारी रामचंद्र कांबळे, शितल पाटील, गणेश शिंदे, नितीन बनगे, विजय राजापुरे, समन्वयक जनगणना , गौस जमादार, राहुल पांढरपट्टे, दिलीप पारसे आदींसह टेक्निकल असिस्टंट शंतनु सोनवणे, सत्यजित पाटील, साहील चोपडे, अर्जुन लोले उपस्थित होते.याचबरोबर जनगणना २०२७ करिता दि. १ मे २०२६ ते दि.१५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी इचलकरंजी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी https://se.census.gov.in या पोर्टलवर माहिती भरून स्वयंगणना करावी असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.