इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.११: डीकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मधील पाच व बी.टेक. टेक्स्टाईल मधील तीन अशा ८ विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य व जागतिक स्तरावर नावजलेल्या वेलस्पन या वस्त्रोद्योग कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखन्नीय यशामुळे डीकेटीईच्या उत्कृष्ट शैक्षणिक व प्लेसमेंट परंपरेला पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे. वेलस्पनच्या वापी, अंजार, हैद्राबाद येथील अत्याधुनिक उत्पादन युनिटसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
टेरी टॉवेल्स, शीटींग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, फलोरीन्स मटेरिएल यांसारख्या विविध उत्पादन क्षेत्रांत अघाडीवर असलेली वेलस्पन कंपनी दरवर्षी डीकेटीई कॅम्पसला भेट देवून विद्यार्थ्यांची निवड करते. यावर्षीदेखील कंपनीने लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तीक मुलाखत अशा विविध टप्प्यांतून विद्यार्थ्यांची तांत्रिक गुणवत्ता, संवाद कौशल्य व उदयोगाभिमुख दृष्टीकोन तपासून अंतिम निवड केली.
दर्जेदार शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगसंलग्न प्रशिक्षण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप तसेच उत्कृष्ट प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करुन देण्यात डीकेटीई संस्था देशात वेगळी ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचीही डीकेटीईला वाढती पसंती मिळत आहे.
निवड झालेले विद्यार्थी – डिप्लोमा विभागातून सोहम सुल, आझाद जामदार, पार्थ खाडे, अजयकुमार उपासे, श्रुतिका पाटील तर बी.टेक टेक्स्टाईलमधून – सानिका पाटील, विनंती चव्हाण व सायली खैरनार.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.