शिरोळ: राम आवळे
दि.६ : आज ६ जून छत्रपती श्री शिवाजी महाराज “शिवराज्याभिषेक” दिनानिमित्त शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तख्त व छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तख्त येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व डॉ. वाघ यांच्या सुदर्शन आय हॉस्पिटलच्या वतीने नेत्रतपासनी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक दरगु गावडे साहेब, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजीबापू पाटील नरदेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती श्री शिवाजी महाराज व महाराणी छत्रपती श्री ताराबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सुप्रसिद्ध मधुमेह व थायरॉईड तज्ञ डॉ. सुनील कोल्हे व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार पाटील, आरोग्य केंद्र ऍडमिनिस्ट्रेटर ए. ई. पाटील, फार्मासिस्ट प्रदीप पाटील, स्टाफ क्षितिज सुतार व नितेश कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.