इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३. डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘मी राजवाडा बोलतोय‘- या अभिनव ओपन हाऊस सेशन अॅट कॅम्पस या कार्यक्रमास अभुतपूर्व आणि विक्रमी प्रतिसाद लाभला.प्रथम वर्ष इंजिनिअरींगला अॅडमिशन धेवू इच्छुक २००० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत डीकेटीईच्या शैक्षणिक परंपरा,आधुनिक सुविधा,उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि उज्वल करिअर संधीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या कार्यक्रमाचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता डीकेटीईमध्ये वेगवेगळया १३ ठिकाणी प्रेक्षपणाचे नेटके आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरवात माजीविद्यार्थी व पालक यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ.एल.एस.आडमुठे यांनी उपस्थितांच स्वागत करत विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील दुरदृष्टी, कौशल्यविकास आणि जागतिक स्पर्धेतील संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर मागील वर्षाच्या कटऑफ पुस्तीकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करुन कटऑफ बुक उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या मी राजवाडा बोलतोय या मनोगतातून डॉ अश्विनी रायबागी यांनी डीकेटीईचे शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा, संशोधन व नवोपक्रमांची संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रमांचे प्रभावी चित्रण केले. डीकेटीईवरील माहितीपटाद्वारे उपस्थितांना आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमधील उत्कृष्ट प्लेसमेंट संधी याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचा सर्वात प्रेरणादायी सत्र म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाने रंगला. डीकेटीईमध्ये शिकलेले माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला तनीशा गुळवणी, सौरभ पाटील, महेश भिरंगी, वृषाली परबकर, तेजस भिडे, मृण्मयी जोशी व प्रेरणा सुतार आपल्या व्यावसायिक यशाचा प्रवास उलगडताना डीकेटीईने दिलेले शिक्षण, मार्गदर्शन आणि संस्कार यांचा कृतज्ञपूर्वक उल्लेख केला. डीकेटीई ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी, आत्मविश्वास निर्माण करणारी आणि यशाचा मार्ग दाखविणारी प्रेरणाभूमी आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यानंतर सिदगोंडा पाटील पालक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त करीत असताना डीकेटीईबददल असलेला विश्वास, संस्थेचे विद्यार्थ्यांशी असलेले बांधिलकीचे नाते आणि पालकांशी राखलेला सातत्यपूर्ण संवाद याचे कौतुक केले.
प्रथमवर्ष विभागप्रमुख डॉ ए.के.घाटगे यांनी सीईटी प्रवेश प्रक्रिया,कॅप राउंडची कार्यपध्दती व प्रवेशप्रक्रियादरम्यान घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांच्या विविध शंकाचे निरसन करीत त्यांना प्रवेशप्रक्रियेतील बारकावे अत्यंत सोप्या भाषेत सांगितले. डीकेटीईने तयार केलेल्या डीकेटीई कटऑफ ट्रॅकर अॅपबददल माहिती देवून ते अॅप डाउनलोड करण्याबददल मार्गदर्शन केले.यानंतर विद्यार्थी व पालकांची गटवार विभागणी करुन संपूर्ण कॅम्पसची मार्गदर्शित भेट आयोजित करण्यात आली. विविध विभाग, प्रयोगशाळा,आयडिया लॅब,स्टार्टअप कटटा,लायब्रररी आणि विद्यार्थी विकास उपक्रमांची माहिती घेताना उपस्थितांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. संस्थेची पायाभूत सुविधा, उद्योगाभिमूख वातावतरण आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधी पाहून पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रम संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजीमंत्री प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव प्रा. डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे,यांचेसवे डायरेक्टर, डे.डायरेक्टर सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन मिळाले. सोशल डीन प्रा.एस.जी.कानिटकर यांनी सुत्रसंचालन केले.