शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना पोलीस कार्यपद्धतीची माहिती

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि. १४ जुलै २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या वृक्षलागवड सप्ताहानिमित्त शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच कलानगर पोलीस वस्तीगृह परिसरात आयोजित कार्यक्रमात परिसरातील नगरसेवक, महिला समाजसेविका, सामाजिक कार्यकर्ते आणि रवींद्रनाथ टागोर विद्यामंदिर, इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली.यावेळी विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण, छळ किंवा अन्य समस्या उद्भवल्यास निर्भया पथक, आपत्कालीन ११२ सेवा तसेच ऑनलाइन माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.


तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता आणि पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री  श्री शरद मेमाणे ,पैलवान अमृत मामा भोसले ,नगरसेवक संतोष शेळके, नगरसेवक अभिषेक वाळवेकर ,नगरसेवक ओमकार सुर्वे, नगरसेवक शिवाजी पाटील ,नगरसेविका सपना भिसे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी ,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते