कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.१८ जुलै २०२६ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने “तरुण मन समजून घेऊया” या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिरीष शितोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. बी. बलुगडे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. शिरीष शितोळे यांनी आजच्या तरुणाईसमोरील सामाजिक, मानसिक आणि भावनिक आव्हानांचा वेध घेत वर्तमान परिस्थितीतील बदलांवर सखोल भाष्य केले. तसेच जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आनंदी राहण्यासाठी ‘हॅपिनेस फॉर्म्युला’ विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी आजच्या तरुणांनी बदलत्या परिस्थितीचा योग्य विचार करून जबाबदारीने व सकारात्मकतेने जीवनाकडे पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली.या उपक्रमाला श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमास डॉ. के. एम. देसाई (स्टाफ सेक्रेटरी), डॉ. डी. के. वळवी (मराठी विभागप्रमुख), रवींद्र भोसले (प्रबंधक), मनिष भोसले (अधीक्षक) यांच्यासह महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. पी. पी. भाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. डी. के. वळवी यांनी मानले