संगमेश्वर : दीपक तुळसणकर
दि.२१ जुलै २०२६ : कडवई (ता. संगमेश्वर) येथील कुंभारवाडी प्राथमिक शाळेत संगमरत्न फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनतर्फे प्रचितगड मुखपृष्ठ असलेल्या वह्या, चित्रकला वह्या तसेच कॅच पेनचे वितरण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख रवींद्र कदम, उपशिक्षक समाधान पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, वाचनाची आवड आणि शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही आनंदाने साहित्य स्वीकारत संगमरत्न फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्तमरीत्या करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.