संगमेश्वर : दीपक तुळसणकर
दि.२१ जुलै २०२६ : कडवई (ता. संगमेश्वर) येथील कुंभारवाडी प्राथमिक शाळेत श्री संत सिताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख रवींद्र कदम, उपशिक्षक समाधान पाटील तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, वाचनाची सवय आणि शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरीत्या करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.