शिरोळ : राम आवळे
दि.२१ जुलै २०२६ : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ईश्वरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, ईश्वरपूर संचलित श्री आण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा २०२६ शिक्षणमहर्षी श्री आण्णासाहेब डांगे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उत्साहात पार पडल्या. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला.या स्पर्धेत कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या कुस्ती व मल्लखांब केंद्रातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले.
वैयक्तिक गटात १८ वर्षांखालील मुलांच्या गटात मयूर गावडे याने रौप्यपदक पटकाविले.
सांघिक गटातील खेळाडू
१८ वर्षांखालील मुले: आज्ञेश मुडशिगिकर, अथर्व कोळी, विज्ञान तमायचे, पृथ्वीराज अरागे, हर्षवर्धन गावडे, मयूर गावडे.
१६ वर्षांखालील मुली: अनुपमा पाटील, मुक्ता धनगर, कावेशी कुंभार, अमृता पाटील, निशिगंधा आंबी, भूमिका पाटील.
याशिवाय, इंडियन आर्मीमध्ये भरती झालेल्या पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या सर्व खेळाडूंचा व पै. अभिजीत विरेंद्र यादव यांचा दत्त उद्योग समूहाचे प्रमुख तथा सहकारमहर्षी गणपतराव पाटील (दादा) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक संजीव देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धूमे, प्रशिक्षक संजय देबाजे, चंद्रशेखर कलगी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या या कामगिरीमुळे संस्थेच्या व परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.