मुरूम टाकून बुजविले स्वखर्चाने खड्डे

कडवईचे माजी सरपंच बापू कदम यांचा आदर्श उपक्रम

कडवई:नियाझ खान
दि: १ जानेवारी कडवई ते कुंभारखानी जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील खड्डे माजी सरपंच कडवई बापू कदम यांनी स्वखर्चातून बुजविले आहेत.

कडवई कुंभारखानी जिल्हा परिषद रस्त्यावर मोठमोठ्ठे खड्डे पडले होते.या खड्ड्यातून वाहन चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती.पावसातून खड्ड्याचा अंदाज न आल्याने या चिखलमय खड्ड्यात पडून दुचाकी स्वार पडले होते.सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कडवईचे माजी सरपंच बापू कदम यांना सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी चीड निर्माण झाली. मात्र, हातावर हात ठेवून न बसता त्यांनी स्वतःच्या खर्चाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले.