शरद पॉलिटेक्ऩिकमध्ये प्राध्यापकांसाठी एफ.डि.पी. संपन्न

ए.आय.सी.टी.ई. व आय.एस.टी.ई. कडून स्पॉन्सरशीप

यड्राव : प्रतिनिधी

दि:.21 यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिक येथे इलेक्ट्रीकल विभागामार्फत 6 दिवसाचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एफडीपी) झाले. या एफडीपीमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील 121 प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. या प्रोग्रॅमसाठी आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) व इंडियन सोसायटी फॉर टेक्ऩिकल एज्युकेशन यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

सहा दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये इंडक्शन जनरेटर, स्कायलॅब फॉर कॉम्प्युटींग अॅण्ड सिम्युलेशन, इंडस्ट्री इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन, हारमनी इन द सेल्फ, अॅडव्हान्स इन सोलर अॅण्ड विंड पॉवर टेक्नॉलॉजी, पॉवर क्वॉलिटी, इलेक्ट्रीक व्हेईकल, मॉडर्न इल्युमिनेशन सिस्टीम, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या विषयावर आय.आय.टी. मुंबईचे प्रा. पी.ए. पाटील, कराड शासकिय तंत्रनिकेतनचे प्रा. डि.वा. शिंगारे, जी.पी. पुणेचे डॉ.एस.एस. भरतकर, प्रा. रेवती राऊतराव, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर प्रा. एस.एस. कात्रे, शरद पॉलिटेक्निकचे प्रा. सि.एस. रावळ, प्रा. रजनिश पिसे, डॉ. के हुसेन यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उदघाटन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य बी.एस. ताशीलदार, प्रा. प्राजक्ता चौगुले यांच्यासह शिक्षक उपस्थीत होते.