संगमेश्वर:-मुजीब खान
दि 30 जानेवारी संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल्ला मालगुंकर व झुलेका मालगुंडकर आणि अलीम मालगुंडकर यांच्या परिवाराकडून ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या न्यू.व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल आंबेड बु. च्या शाळेच्या बांधकामाचे कामं सुरु असून सामाजिक भावनेतून मालगुंडकर परिवाराने आज शाळेच्या बांधकामसाठी २५ हजारची देणगी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांच्याकडे सुपूर्द केली.
नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी साठी आंबेड येथे न्यू. व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल सुरु करण्यात आली. इयत्ता १० वी पर्यत मान्यता प्राप्त शाळा म्हणून ग्रामीण भागात कार्यरत आहे. या शाळेला सलाऊद्दीन बोट या व्यक्तीने 1 एकर जागा मोफत दिली. त्या जागेत शाळा बांधकाम सुरु असून या शाळेच्या बांधकामसाठी अनेका ठिकाणी हुन मदत येत असून अलीम मालगुंडकर, अब्दुल्ला मालगुंडकर, आणि झुलेका मालगुंडकर या परिवार कडून रोख रक्कम २५ हजार देणगी म्हणून देण्यात आली आहे. या देणगीदारांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
ही देणगी देताना अब्दुल्ला मालगुंडकर त्यांच्या पत्नी झुलेका मालगुंडकर नवनिर्मिती संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज, शाळेचे उपाध्यक्ष आणि कुरधुंडा माजी सरपंच जमूरत अलजी, उपसरपंच तैमूर अलजी आदी उपस्थित होते.