धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

धामणी बदडवाडी नळ पाणी पुरवठा योजनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
कडवई :-सादीक नाईकोडी
संगमेश्वर तालुक्यातील धामणी बदडवाडी करीता नळपाणी पुरवठा योजना माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोयना भूकंप पुनर्वसन निधी अंतर्गत तसेच जि. प. सदस्य श्री. संतोष थेराडे यांच्या प्रयत्नाने १४व्या वित्त आयोगा अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. सदरची कामे उत्तमरित्या पूर्ण झाली असून या कामांचे उदघाटन मा. आमदार श्री. सदानंद चव्हाण यांच्या शुभहस्ते व जि. प.सदस्य श्री. संतोष थेराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उत्साहात संपन्न झाले.
या पाणी योजनेमुळे धामणी बदडवाडी वासियांची पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ढोल ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी पं.स.सदस्य दिलीप सावंत, विभागप्रमुख अनंत उजगावकर, क्षेत्र संघटक सौ.ऐश्वर्या घोसाळकर, उपविभागप्रमुख दत्ताराम लाखण, सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, गावकर जयराम बांबाडे, मुंबई मंडळ अधक्ष प्रविण बांबाडे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश रांजणे, रामचंद्र बांबाडे व ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठया संख्येने उपस्थित होते.