वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्शवंत

प्रसिद्ध व्यापारी नानासाहेब नष्टे यांचे गौरवउद्गार

इचलकरंजी -विजय मकोटे

दि: ८ जानेवारी येथील लिंगायत समाजाची प्रातिनिधीक संस्था वीरशैव उत्कर्ष मंडळाचे कार्य आदर्श स्वरुपाचे असून समाज जोडणार्‍या गौरव सोहळ्यसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून इतरत्र असणार्‍या मंडळांना दिशा देण्याचे कार्य केले आहे, असे उद्गार श्री वीरशैव को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक, प्रसिद्ध व्यापारी नानासाहेब नष्टे यांनी काढले. 
वीरशैव उत्कर्ष मंडळाच्यावतीने समाजातील मान्यवरांची विविध पदावर झालेल्या निवडी आणि विविध पुरस्कार प्राप्त तसेच दातृत्वशील व्यक्तींचा गौरव सोहळा पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. नष्टे बोलत होते.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. संस्थेचे सेक्रेटरी किशोर पाटील यांनी स्वागत व पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे यांनी प्रास्ताविकात 1967 सालापासून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. भविष्यातील संकल्पाची माहिती विषद केली व समाजबांधवांकडून भरीव सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेने संचलित केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविलेबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर विविध पदावर निवड झालेल्या आणि पुरस्कार मिळालेल्या तसेच श्री मृगेंद्रआण्णा सुलतानपुर विद्यामंदिर शाळेच्या दुसर्‍या मजल्यावरील वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी आर्थिक सहकार्य करणार्‍या दानशूर व्यक्तीचा गौरव करण्यात आला.
वीरशैव बँकेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र लकडे, उपाध्यक्ष अनिल स्वामी, उत्कर्ष मंडळाच्या सिव्हिक बोर्डाचे अध्यक्ष इरगोंडा पाटील, सदस्य  विलास गाताडे, अशोक देगांवकर, कुरुहीन शेट्टी समाज इचलकरंजीचे अध्यक्ष व राज्यस्तरीय कुरुहीन शेट्टी समाजाचे सेक्रेटरी सुनिल कोष्टी, आजरा को-ऑप. बँकेचे उपाध्यक्ष किशोर भुसारी, मर्चंट को-ऑप. बँकेचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, म.जगद्ज्योती बसवेश्‍वर सह. सुतगिरणीचे अध्यक्ष मुकुंद माळी व उपाध्यक्ष विजय हावळे, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे सेक्रेटरी राजू तारदाळे, इनरव्हिल क्लबच्या प्रेसिडेंट सौ. मिनाक्षी तंगडी, रोटरी क्लब प्रोबसचे सेक्रेटरी शिवबसू खोत, इचलकरंजी वायरमन असोसिएशनचे अध्यक्ष  राजू पाटील, उपाध्यक्ष सुहास कोरे, वीरशैव माळी समाज महिला मंडल अध्यक्ष सौ. शुभांगी माळी, इचलकरंजी परिसर मुद्रक संघ खजिनदार कलगोंडा पाटील यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर समाजामध्ये विशेष पुरस्कार मिळालेले सौ. अलका स्वामी (कस्तुरी इनप्रिएशन अ‍ॅवार्ड 2022), बाळासाहेब पाटील (आदर्श उद्योजक प्रेरणा पुरस्कार 2022), दत्तात्रय कित्तुरे (क्रीडा मार्गदर्शन 2022), राजन मुठाणे (साहित्यीक  कार्यकर्ता पुरस्कार, म.रा.प. पुणे), बाळासाहेब देवनाळ (सल्लागार, महाराष्ट्र प्रवासी संघ), राजू दरिबे (समाज रत्न पुरस्कार, श्रमिक एकता संघ), सौ. ज्योती पाटील (कोल्हापूर महाराणी, महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2021 आणि पी.सी.एम.सी. फैशन आयकॉन (2025), श्री. विठ्ठल तोडकर (ऑफर्टेबल रेसिडेन्टल प्रॉपटी ऑफ द इयर 2021) यांचा मंडळाकडून मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तर संस्थेच्या बालवाडीचे देणगीदार डी. एम. बिरादार आणि श्री. मृगेंद्रआण्णा सुलतानपुरे प्राथमिक विद्यामंदिरच्या दुसर्‍या मजल्याच्या बांधकामासाठी देणगी दिलेले दानशूर व्यक्ती किशोर भुसारी, प्रशांत भदरगडे, वसंतराव दत्तवाडे (यांचेवतीने तरुण दत्तवाडे), गजानन सुलतानपुरे, सुरेश पाटील, युवराज माळी, अनिल स्वामी, अशोक माळी, डॉ. बाळकृष्ण कित्तुरे , डी. एम. बिरादार यांचाही मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
सुशांत मुरदंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सिव्हीक बोर्ड सदस्य बसवेश्‍वर डोईजड, मंडळाचे संचालक बाबासाहेब पाटील, डी. जी. कोरे, गजानन बिडकर, रमेश नाईकवडे तसेच शिवमंदिर कमिटीचे सर्व संचालक, स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ. हेमल सुलतानपुरे व त्यांचे सर्व संचालक, रुद्रभूमी कमिटीचे अध्यक्ष उमेश पाटील व त्यांचे सर्व संचालक, लिंगनगुडी कमिटीचे अध्यक्ष बापू पाटील व सर्व संचालक, अक्कमहादेवी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. महादेवी खोत, महिला मंडळ अध्यक्षा सौ. सुवर्णा दत्तवाडे व इतर मान्यवर अशोक चनविरे, रविंद्र डोईजड उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री मृगेंद्रआण्णा सुलतानपुरे प्रा. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रसाद देवमोरे व त्यांचा सर्व स्टाफ, विद्यानिकेतन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जगताप व त्यांचा सर्व स्टाफ, श्री. अडकिला सर, संस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार महोद यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन विजयानंद लंबे व सौ. थोरात यांनी केले.