संजय घोडावत विद्यापीठाच्या २५ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीमध्ये निवड

हातकणंगले : अब्दुल नदाफ
दि र९ शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या  संजय घोडावत विद्यापीठाच्या  मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन व इलेक्टिकल इंजिनीरिंग विभागाच्या २५ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस  कंपनीमध्ये निवड झाली आहे. 
दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या  ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात.
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस एक प्रख्यात कंपनी असून जगभरात विविध देशात या कंपनीच्या शाखा आहेत. आय टी क्षेत्रात  या कंपनीने आपला नावलौकिक प्राप्त केला आहे.  या पूल कॅम्पस ड्राईव्ह मध्ये सांगली व कोल्हापूर, जिल्ह्यातील इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.स्वप्निल हिरीकुडे,  ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर मकरंद जोशी व फॅकलटी कोऑर्डिनेटर्स प्रा. उदय माने, प्रा. प्राची शिंदे, प्रा. विकास भंडारी व प्रा. पंकज गवळी  यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमीक डीन डॉ. उत्तम जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.