राष्ट्रीय महामार्ग ६६ तुरळ येथे उड्डानपूल उभारण्यात यावा, मनसे कडून निवेदन.

संगमेश्वर:-
संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील मौजे तुरळ येथे उड्डान पुल उभारण्यात यावा यासाठी मनसेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता याना निवेदन देण्यात आले आहे .या मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास २ मे रोजी सकाळी ११ वाजता तुरळ येथे ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय मुंबई – गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येथे सध्या चौपदरीकरणाचे काम जोमाने सुरू आहे . परंतु सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामावरून स्पष्ट होत आहे की , सदर महामार्गावरील वाहतुक व प्रवाशी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महामार्गाच्या आराखाड्यात कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला नसुन लगत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील विश्वासात घेतलेले नाही . शिवाय महामार्गाच्या कामाच्या कोणत्याही ठीकाणी सदरचा आराखाडा प्रदर्शित केलेला नसल्यामुळे सदरबाबत संबंधीत संस्थांसह सर्वसामान्य नागरीक अनभिज्ञ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येसध्या कडवई,धामापुर व माखजन कडे जाणारे प्रमुख तीन फाटे असुन दुर्गम भागातील सुमारे १५० गावातील चिपळूण व रत्नागिरी या दोन्ही विरोधी दीशांच्या शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते . शिवाय दुचाकी , तीन चाकी व मालवाहु चारचाकी वहानांची देखील संख्या जास्त आहे . केवळ महामार्गाचे बजेट कमी करणेसाठी उड्डान पुलाला बगल देत महामार्गाच्या आराखाड्यात याचा विचार न झाल्यामुळेच भविष्यात सदरची बाब स्थानिक सर्वसामान्य नागरीकांच्या जीवीतावर बेतणार आहे .
चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाल्यानंतर कडवई कडुन चिपळुण च्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांने तसेच वहानचालकांने दोन्ही दिशांकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या वहानांना हात दाखवुन थांबवायचे का ? आणि ते तसे थांबतील का ? असा सवाल निवेदनातून उपस्थीत केला गेला आहे .
सदर ठीकाणी महामार्गावर पांढरे पट्टे मारण्यात येतील वेग मर्यादा ठेवण्यात येईल . परंतु या सर्व उपाययोजना केल्यानंतर अपघात होऊन होणारी जीवीत हानी टाळण्याबाबत महामार्ग विभाग किंवा शासन हमी घेणार का ? असा जाब निवेदनातून विचारण्यात आला आहे .
रायगड जिल्ह्यातील कामोठे येथे शेकडो प्रवाशांची जीवीत हानी झाल्यानंतर शासनाला व संबंधीत खात्याला जाग आली . आणि ती परीस्थीती आमच्या भागातील सर्वसामान्य नागरीकांच्या वाट्याला येऊ नये याकरिता सध्या सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ थांबवून महामार्गाच्या आराखाड्यात बदल करून संगमेश्वर तालुक्यातील मौजे तुरळ येथे उड्डान पुल उभारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे .
येत्या महीन्याभरात वरील उड्डान पुलाच्या मागणीबाबत सकारात्मक कार्यवाही व्हावी अन्यथा सर्वसामान्य नागरीकांच्या हीता करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संबंधीत दुर्गम भागातील नागरीक यांच्या वतीने तुरळ येथे महामार्गावर दि . २ मे २०२२ रोजी सकाळी ११.०० वा . ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल व त्यामुळे निर्माण होणाऱ्या परीणामास आपण व शासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे .
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण ,उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत,कामगार सेना जिल्हा चिटणीस अनिरुद्ध खामकर , उपशहर अध्यक्ष अमोल श्रीनाथ संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष महेश गुरव आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

123