कडवई:-
महाराष्ट्राचे स्पृर्तोस्थान छत्रपती संभाजी राजे यांचे शासकिय स्मारक संगमेश्वर येथे मुंबई-गोवा नॅशनल हायवे नंबर 66 ला लागुन आहे त्याच स्मारकाला लागुन संगमेश्वर वासियांची पुरातन असलेली जागृत ग्रामदेवता श्रीदेवी जाखमाता मंदीर आहे सध्या जाखमाता मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज यांचे शासकीय स्मारक आहे त्या किमान तिनशे ते चारशे मिटर लांबीची संरक्षण भिंत होत असुन तिची ऊंची किमान स्मारकाच्या आणि मंदिराच्या चौथऱ्या च्या ऊंची एवढी वाढवावी आणि संरक्षण भिंतीच्या आतून बाजून पावसाळाचे पाणी वाहून जाणे साठी काँक्रीटचा नाला करावा आणि स्मारक व मंदिरमध्ये जाण्यासाठी कॉंक्रीटचा रस्ता व पायऱ्या कराव्यात, अशी मागणी अशोकराव जाधव उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आणि अध्यक्ष शेतकरी _ कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे .
या बाबतचे निवेदण मा.केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,अजित दादा पवार उपमुख्यमंत्री,अशोकरावजी चव्हाण बांधकाम मंत्री ,आदित्य ठाकरेजी पर्यावरण मंत्री जिल्हा अधिकारी रत्नागिरी , एक्झूकेटिव्ह इंजिनिअर यांना देण्यात येणार असलेचे अशोकराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.