कु. सान्वी विजय पोवळे हिच्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार

इचलकरंजी: प्रतिनिधी

दि. १९ एप्रिल नुकत्यात ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हा योगासन स्पोर्टस् चॅम्पिनयशीप स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थीनी कु. सान्वी विजय पोवळे हिने चार प्रकारात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तिचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोशिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन अ‍ॅन्ड स्पोर्टस् कौन्सिल ऑफ महारष्ट्र संलग्न ब्रिहन महाराष्ट्र योगा परिषद यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा योगासन स्पोर्टस् चॅम्पियशीप स्पर्धेत सब ज्युनिअर गटात कु. सान्वी पोवळे हिने आर्टीस्टीक पेअरमध्ये प्रथम, आर्टीर्स्टीक सिंगलमध्ये द्वितीय, रिदॅमिक पेअरमध्ये प्रथम व ट्रेडीशनल इंडीव्ह्युजलमध्ये पाचवा असे घवघवीत यश संपादन केले. कु. सान्वी हिने आजवर विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यश प्राप्त केले आहे. जिल्हा योगासन स्पर्धेतील तिच्या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते कु. सान्वी हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तुकाराम पाटील, शशिकांत नेजे, गोगा बाणदार आदी उपस्थित होते. कु. सान्वी हिला योगप्रशिक्षक सुहास पोवळे यांचे मार्गदर्शन आणि आई-वडीलांचे प्रोत्साहन लाभत आहे. या यशाबद्दल तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.