जनरल प्रॅक्टिशनर्सच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीची सांगलीवर मात

रत्नागिरी :-
जनरल प्रॅक्टिशनर्स असोशिएशनतर्फे कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या संघाने बारामती, सांगली या संघांसह प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.रत्नागिरीने सांगली संघावर विजय मिळवला. यात डाॅ. अलोक निकम यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
रत्नागिरी संघामध्ये डॉ.अभिराज नारकर (संगमेश्वर), डॉ.संजोग सुर्वे (रत्नागिरी), डॉ. अलोक निकम (रत्नागिरी), डॉ.नितीन भगत (देवरुख), डॉ.प्रशांत काळे (गुहागर), डॉ.निलेश ढेरे (गुहागर), डॉ.सौरभ पाटेकर (गुहागर), डॉ.अक्षय शिरगावकर (गुहागर), डॉ.गणेश कोलते (राजापूर), डॉ.संदिप चांदूरकर (राजापूर), डॉ.श्रेयस जाधव (रत्नागिरी), डॉ.उदय चव्हाण (राजापूर) आणि डॉ.रोहित दुडये (राजापूर) यांचा समावेश होता.

113