इचलकरंजी : संजय आंबे
ता. २६ मे ः येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल डिप्लोमा मध्ये शिक्षण घेणा-या सहा विद्यार्थ्यांची देशातील नामवंत जॉकी कंपनी मध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे. जॉकी, बेंगलोर येथे डिकेटीई डिप्लोमाचे निवड झालेले सहा विद्यार्थी विविध पदावर लवकरच रुजू होणार आहेत.
काळाची गरज ओळखून लॉकडाउन नंतरच्या काळात देखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वालिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डिकेटीई मार्फत वेळोवेळी ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जॉकी कंपनीने ऑनलाईन इंटरव्हयुवचे आयोजन केले होते.
जॉकी ही १४० हून अधिक देशामध्ये कार्यरत असणारी नामांकित कंपनी असून या कंपनीचे पोहण्याचे कपडे, इनरविअर, स्पोर्टसविअर, सॉक्स व थर्मल या ब्रँडने अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी ही कंपनी डिकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी ऑनलाईन इंटरव्हयूव द्वारे किंवा प्रत्यक्ष भेट देत असते. यावर्षी या कंपनीमार्फत ऑनलाईन आयोजित रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयूव अशा अनेक फे-यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमताची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे एकूणच शैक्षणिक गुणवत्ता यावरुन त्याची उत्तम पॅकेजसह निवड केली. सदर जॉकी कंपनीमध्ये साहील तांबोळी, पवन दांडाले, निलेश बोली, अनिरुध्द पाटील, मयुरी परदेशी, विनंती चव्हाण या डिप्लोमा प्राप्त विद्यार्थ्यांची निवड झाली.
डिकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्रामस, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व सोयीनीयुक्त वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज, उपलब्ध लायब्ररी सुविधा या सर्वामुळे हे विद्यार्थी यशाची शिखरे सर करतात. या सर्वामध्ये डिकेटीईच्या टेक्स्टाईल विभागाचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकीवाटे यांचे मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना डिकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.आर.के. वळसंग यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईचे डीप्लोमा टेक्स्टाईल विभागातील जॉकी या कंपनीत निवड झालेले विद्यार्थी