चिपळूण : –
मा.अशोकराव जाधव यांचे नेतृत्वाखाली चलो चिपळूण आपल्या हक्का साठी चिपळूण मध्यवर्ती एस टी स्टँड अर्धवट बांधकाम पुर्ण करुन घेण्यासाठी , प्रवासी नागरीक यांचे सोयी साठी , न्याय हक्काच्या मागणी साठी रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी सकाळी ९:३०ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत एस टी स्टँडवरच एक दिवसाचे धरणे अंदोलनात सर्वानी सामील व्हा.
विसरा मतभेद , विसरा मनभेद आणि भ्रष्ट प्रशासन , ठेकेदार यांचे मुळे प्रवासी जनतेचे हाल होत आहेत ते थांबविण्या साठी संघटीत व्हा , धरणे आंदोलनात सामिल व्हा .ज्यांना ज्यांना वाटते प्रवासी जनतेचे हाल होऊ नयेत अशा सर्वानी रत्नागिरी जिल्हातील काँग्रेस कार्यकर्तानी , नेत्यांनी , शेतकरी _ कष्टकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जनते विषयी न्याय हक्काच्या मागणीबाबत ज्यांचा ज्यांचा पाठींबा आहे अशा सर्व ग्राम पंचायतीचे सरपंच , सदस्य , निवडणुकीला ऊभे राहिलेले सदस्य बंधु भगिनी , स्वयंमसेवी संस्था , लोक प्रतिनीधी , मंडळे , बचत गट , शेतकरी बचत गट , एस टीने प्रवास करणारे प्रवासी या सर्वांनी मा अशोकराव जाधव यांचे नेतृवा खाली होणाऱ्या धरणे अंदोलनात सामील व्हा . असे आवाहन महादेव चव्हाण , अल्पेश मोरे , सुधिशेठ दाभोळकर , डॉ शळके, अॅड जिवन रेळेकर , शहाजी पवार , यश पिसे , सुरेश राऊत , सुरेश पाथरे, निर्मला जाधव , गौरी रेळेकर , भरत लब्धे , दिपक निवाते, कैसर देसाई , मैनुद्यीन सय्यद, पप्पा शेट साळवी , मेजर मनोहर शिंदे , राजेंद्र जी भुरण , तानाजी चव्हाण , राकेश दाते , बशीर बेबल विश्वनाथ किल्लेदार , समीर रेडीज , ऊत्तम गायकवाड, दिपक दळवी, शशिकांत दळवी ,अनंत धामणे , सुनील साळवी, शशिकांत सकपाळ इत्यादींनी धरणे आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे .