कोल्हापूर: प्रतिनिधी
दि: ४ जून संजय घोडावत विद्यापीठाच्या मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागाचे प्रा. शैलेंद्र वि. ढणाल यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. ”सिंथेसीस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ एनआय-एमएन-एसएन अँड एनआय-एमएन-एल शेप मेमरी अलॉयज” च्या पीएच.डी चा मुख्य विषय होता. त्यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. एस ए कोरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ. शैलेंद्र ढणाल यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण रुकडी एथे रयत शिक्षण संस्था मध्ये झाले. नंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथून मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण अर्थातच एम ई इंजिनीरिंग पूर्ण केले. तसेच यानंतर त्यांनी २०२२ साली विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत , विश्वस्त श्री. विनायक भोसले व कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.