रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन करिता इचलकरंजीतुन हजारो भाविक जाणार

इचलकरंजी संजय आंबे
दि. १८जून : येथील श्री काळा मारुती आरती भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रामचरित मानस मराठी ग्रंथ ध्वनीमुद्रणाचे प्रकाशन रामजन्मभूमी आयोध्या येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी इचलकरंजीतुन हजारो भाविक जाणार आहेत. त्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांची मंडळाच्या वतीने भेट घेण्यात आली. पुणे येथील चासतमान चे स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांनी रामचरित मानस मराठीत अनुवादीत केले आहे. त्याचे प्रकाशन 2007 मध्ये आमदार आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले असून या रामचरित मानसचा लाभ तमाम भक्तांना व्हावा यासाठी आमदार आवाडे यांच्या संकल्पनेतून इचलकरंजीतील गोकुळ चौक परिसरात असलेल्या श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्यावतीने संगीतमय ध्वनीमुद्रण करण्यात आले आले आहे. याङ्गपवित्र ग्रंथ रामचरित मानसचे रामजन्मभूमी आयोध्या याठिकाणी 1100 भक्तांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. आयोध्या येथे जाण्यासाठी रेल्वेची गरज असून इचलकरंजी येथून जाणार्‍या भक्तासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मंडळाचे सचिव श्रीकांत टेके, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, अलका सुर्यवंशी, वैशालीताई गजगेश्‍वर, गोविंदलाल बजाज, रामदेवजी राठी, उमेश कनोजे, राहुल डांगे, तात्यासाहेब पुजारी, सुभाष तोडकर आदी उपस्थित होते.