कबनूरात कर्नाटकी बेंदूर उत्साहात

कबनूर :चंदुलाल फकीर

दि. १९ जून:कबनूर येथे शेतकरी बांधव,ग्रामस्थ व
नागरिकांच्या उपस्थितीत कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. झेंडा चौकात संजय लिगाडे यांच्या  मानाच्या बैलाने कर तोडली. बेंदूर सणनिमित्त गावातील घरोघरी बैलांचे औक्षण व पूजाअर्चा करत पुरण पोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.सजवणेत आलेल्या  पंधरा बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात आली.
यंदा गावातील राजकारण बाजूला ठेवून बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला  होता .शेतकऱ्यांनी बैलांची स्वच्छता करुन विविध रंग आणि आकर्षक सजावट करत ढोल ताशाच्या गजरात बैलजोडीची मिरवणूक काढली. बैलजोडीच्या मालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमोद सोडगे यांचा विशेष सन्मान करणेत आला. संयुक्त गावभाग कबनूरच्या तरुणाने झेंडा चौक प्रवेशद्वाराजवळ स्वागत कमान उभा करून स्वागत केले होते .संयुक्त गावभागचे सर्व तरुण मंडळी उत्साहात असल्याने बेंदूर सणाला यावर्षी एक वेगळीच रंगत आली होती.