मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक योग दिन” साजरा

कबनूर : दिपक पाटील

दि. २२जून :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे “जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे व संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.सुभाष केटकाळे उपस्थित होते.
योग दिनाच्या निमित्ताने योग व आरोग्य या विषयावर माहिती देण्यात आली तसेच विद्यालयाच्या प्रांगणात योगाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या योग दिनाच्या निमित्ताने मा.सुधाकरराव मणेरे यांनी “आहार, योग व आरोग्य यांची योग्य सांगड घालून आपल्या व्यक्तिमत्त्वाला विकसित करता येते” असे विचार मांडले.
यावेळी हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ.उर्मिला माने, प्राथमिक मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर, कॉलेज इनचार्ज श्री. मलिक मणेर, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.