इचलकरंजी :विजय मकोटे
दि. 25 जून : इचलकंजी येथील युवा उद्योगपती व श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन हरीश बोहरा यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
येथील श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन, मदनलाल बोहरा कापड मार्केटचे संचालक, इचलकरंजी नगरपालिका तरु कमिटीचे सदस्य आणि स्वदेशी ग्रुपचे लाडके मालक, उद्योगपती श्री. हरीश श्रीनिवास बोहरा यांचे आज दिनांक 25 जून रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिण यांच्यासह मोठा परिवार आहे. आपल्या मितभाषी स्वभावाने सर्व परिचित असलेल्या हरीश यांच्या निधनाने वस्त्रनगरी इचलकरंजीवर शोककळा पसरली आहे. २६ जून रोजी सकाळी ९ वाजता शाहू पुतळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार असून पंचगंगा नदी घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.