इचलकरंजी : संजय आंबे
दि. २३ जलै :भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच वाढदिवस ताराराणी पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालय, शाळा, वृध्दाश्रम आदी ठिकाणी फळवाटप करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार प्रकाश आवाडे यांच्या नियोजनाने ताराराणी पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सेवाभारती येथे जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते, सन्मती बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत यशवंत प्रोसेसचे चेअरमन अहमद मुजावर व प्रा. शेखर शहा यांच्या हस्ते, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या हस्ते तर समाधान वृध्दाश्रम येथे अरुण आवळे, राजेंद्र बचाटे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी सन्मती विकास केंद्राच्या व्यवस्थापिका किशोरी शेडबाळे, प्रभारी मुख्याध्यापिका संगिता कुंभार, संजय कुंभार, सायली जोशी, संचिता आमणे यांच्यासह शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी त्याचबरोबर सेवाभारती हॉस्पिटल येथे डॉ. राजेश पवार, नरोत्तम लाटा यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता.
या कार्यक्रमास बाळासाहेब कलागते, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, नारायण दुरुगडे, नरसिंह पारीक, संजय केंगार, अविनाश कांबळे, शैलेश गोरे, कपिल शेटके, प्रदीप दरीबे, प्रविण केसरे, राजाराम बोंगार्डे, नौशाद जावळे, रमेश पाटील, अरुण निंबाळकर, कुमार पलंगे, राजू माळी, दीपक केंगार, श्रीशैल बिळ्ळुर, विजय पाटील, अनिल शिकलगार, बाबासाहेब किल्लेदार, शांताराम लाखे, रंगा लाखे, महादेव पाटील यांच्यासह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते.