५६ व्या स्टेट कॅरम चॅम्पियन स्पर्धेत सलग पाचव्यांदा रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम चॅम्पियन

रत्नागिरी:
पाल घर येथे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या महाराष्ट्र स्टेट कँरम चँम्पीयनशिप कँरम स्पर्धा २०२२-२३ मध्ये सलग पाचव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.अंतिम सामान्यात राष्ट्रीय विजेती आयेशाला 25-12 व 20-14 अशा सरळ दोन सेट मध्ये पराभूत करत इतिहास रचला.उपांत्य फेरीत राष्ट्रीय विजेती निलम घोडकेला सलग दोन सेट मध्ये केले पराभूत केले.ह्या स्पर्धेचे आयोजन पालघर विरार कॅरम व महाराष्ट्र राज्य कॅरम असोशिअन यांच्या संयुक्त विद्यमाने  संपन्न झाली.या स्पर्धेत दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.

       आकांक्षा उदय कदम हिने या आधी सुद्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली छाप उमटवली आहे.या आधी सावंतवाडी,दादर जिमखाना,बोरीवली,विलेपार्ले या आधीच्या सलग चार स्टेट चॅम्पियन व अताची ५ वी स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे.कॅरम क्वीन अशी तिची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बविआ संस्थापक व आमदार भाई ठाकूर यांच्या हस्ते झाला.या यशात आई,वडील,भाऊ,राष्ट्रीय खेळाडू असलेले तिचे मामा देवरुखकर,मित्रमंडळी यांचा असल्याचे सांगितले.या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

353