कडवई तंटामुक्ती अध्यक्ष पदी मुझफ्फर खान

कडवई: ( साद्दीक नाईकोडी )
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली.सोमवारी २२ ऑगस्ट रोजी गृप ग्रामपंचायत कडवईची ग्रामसभा कडवई ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी ४ उमेदवारांनी नाव सादर केला. परंतु गावातील जनतेचा कौल परत ज्येष्ठ नागरिक मुझफ्फर अली खान यांच्या बाजूंनी लागला.आणि त्यांची बहुमताने तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मुझफ्फर खान हे शिपिंग कार्पोरेशन आॅफ इंडिया या मर्चंट नेव्ही कंपनीतून सेवानिवृत्त आहेत.तसेच गावातील सामाजिक कार्यात सहभागी असतात. त्यांच्या निवडीनंतर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, पत्रकार मिलिंद चव्हाण,रोजगार स्वयंरोजगार विभाग काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मुजीब खान,सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच वसंत उजगावकर तसेच गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

            मुझफ्फर खान हे गेली अनेक वर्षे राजकीय व सामाजिक कार्यात सहभागी असून गावच्या प्रत्येक विकास काम असो किंवा अन्य प्रत्येक गावच्या प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.आणि म्हणूनच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन गावच्या वतीने मुझफ्फर खान
यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडी मुळे तंटामुक्ती अध्यक्ष पदी योग्य माणूस बसल्यामुळे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे व सर्वत्र त्यांच्या निवडी बद्दल कौतुक होत आहे.माझ्यावर आज सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी जी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे ती मी निःपक्षपाती पार पाडेन व सर्वांना बरोबर घेऊन काम करेन असे नवीन तंटामुक्ती अध्यक्ष खान म्हणाले.

233