छाया कॉर्नर नागरी सह पत संस्थेची ३४ वी वार्षिक सभा संपन्न

एक आदर्श सहकारी संस्था म्हणून छाया कोर्नर नागरी सहकारी पत संस्थेचे नांव :श्री शामराव कुलकर्णी

इचलकरंजी :विजय मकोटे

दि :30 ऑगस्ट : इचलकरंजी कोरोना काळानंतर सहकार क्षेत्रातील यशस्वीपणे घौडदौड सभासदांच्या विश्वागमुळे चालू ठेवून सभासद व तसेच अनेक सहकारी संस्थाना आर्थीक पाठवळ देऊन त्यांना पुनरूज्जीवन करून चालना देण्याचे काम संस्थेचे संस्थापक श्री सत्यनारायण डाळया यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदर्श सहकारी संस्था म्हणून छाया कोर्नर नागरी सहकारी पत संस्थेचे नांव अगकमाने घ्यावे लागेल असे गौरोवोदगार इंटक नेते श्री शामराव कुलकर्णी यांनी काढले. येथील छाया कॉर्नर नागरी सहकारी पत संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोटरी क्लव ऑफ इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली

स्वागत व प्रास्तावीक संचालक श्री शाम डाळ्या यांनी केले. संस्थेचे मार्च २०२२ अखेर बसुल भागभांडवल ५७ लाख, फंडस् १ कोटी ९५ लाख, ठेवी ७ कोटी ३० लाख गुंतवणुक ५ कोटी १३ लाख कर्जे ४ कोटी ८९ लाख, खेळते भांडवल ११ कोटी ३८ लाख असून मार्च २०२२ अखेर संस्थेस ७ लाख नफा झालेचे सभेचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन श्री सचिन डाळ्या यांनी विषय वाचन करताना व तसेच शासनाच्या नियामक मंडळास राज्य फेडरेशन व जिल्हा फेडरेशन यांच्या मार्फत जाचक नियमास व ठेव अंशदानास विरोध करावा असे सांगितले. विषयपत्रिकेवरील विषय मॅनेजर श्री सुनिल भोसले यांनी केले यास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. अहवाल सालात दिवगंत झालेल्या संस्थेचे सभासद, हितचिंतक, इतर ज्ञात अज्ञात भारतीय जागतीक किर्तीचे शास्त्रज्ञ, थोर साहित्यिक, राजधुरंधर नेते सामाजीक कार्यकर्ते यांना संचालक श्री सतिश काळे समेत श्रद्धांजली अर्पण केली. संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून सभासदांच्या मागणीनुसार चर्चेनुसार व्याज दर बदल करावा व याही पेक्षा अधिक व्यवसाय करावा असे मत श्री राजेंद्र बचाटे यांनी मांडले. सन २०२२ २०२८ या पंचवार्षिक सालाकरीता संचालक मंडळ बिनविरोध झालेचे माजी चेअरमन व संचालक श्री अनिल मगदूम यांनी जाहीर केलेव त्याचप्रमाणे नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार संपन्न झाला. या सभेस संस्थापक श्री सत्यनारायण डाळया यशवंत प्रोसेसचे चेअरमन श्री अहमंद मुजावर डेक्कन प्रोसेसेचे चेअरमन श्री वापूस तेरवाळे सी ए एन ए वमुदे व्हा. चेअरमन सौ भारती सुर्यवंशी, श्री श्रीकांत सारडा, विश्वनाथ भोरे, सौरभ जाधव, श्री यशवंत शेळके श्रीमती स्मिता जाधव सौ अंजली सांबरे सर्व सभासद मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री सुरेंद्र सुर्य वंशी (सर) यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार संचालक श्री नझीर मेंदगी यांनी मानले.