डी.के.ए.एस.सी. कॉलेज मध्ये ‘बिग बटरफ्लाय मंथ’ उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मेकोटे

दि .२५ सप्टेबर : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डीकेएसससी कॉलेज मधील प्राणीशास्त्र विभागा अंतर्गत दि . २२/०९/२०२२ रोजी ‘बिग बटरफ्लाय मंथ’ निमित्ताने व्याख्यान चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याची ओळख प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.के वाघमारे मॅडम यांनी करून दिली. प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. एस. आर. उमराणे यांनी “Awareness and Conservation of beautiful winged wonders of the world” या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. रेश्मा सनदी यांनी केले व प्रा. डॉ. निलोफर शेख यांनी आभार मानले. या कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी श्री. डी.ए. यादव उपस्थित होते.