डी.के.टी.ई. च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील सहा विद्यार्थ्यांची भारत फोर्जमध्ये निवड

इचलकरंजी : संजय आंबे

दि. २५ सप्टेंबर : डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची भारत फोर्ज, पुणे या कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. भारत फोर्ज कंपनीच्या वतीने डी.के.टी.ई. मध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये सदर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.  

 औदयगिक कंपन्यांना लागणारे उत्तम तंत्रज्ञ तयार करता यावेत यासाठी या विद्यार्थ्यांना डीकेटीई मध्ये खास सॉफ्ट स्कीलचे वेगळे सत्र आयाजित करुन त्याव्दारे विद्यार्थ्यांना तांत्रिक व इतर प्रशिक्षण देण्यात येते.  या तयारीचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग झाला व मेकॅनिकल विभागातील ६ विद्यार्थ्यांची भारत फोर्ज मध्ये निवड झाली. मेकॅनिकल विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत जाधव, श्रेयस मुधोळ, केदार चिवाटे, प्रतिक कोथळे, सतेज डांगरे व राजवर्धन कुंभार यांची निवड झाली आहे.  या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

निवड झालेल्या सर्व विद्याथ्यार्ंना संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या.सदर विद्यार्थ्यांस संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील, उपसंचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर.नाईक, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.जी.एस.जोशी, विभाग समन्वयक प्रा.बी.बी.कबनूरे व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.