कोल्हापूर : प्रतिनिधी
ता. १७.गोकुळच्या क्लस्टर बल्क मिल्क कुलर युनिटचे उद्घाटन विजया महिला दूध संस्था गुंजेगाव ता.मंगळवेढा जि.सोलापूर या संस्थेच्या बल्क कुलरचे उद्घाटन गोकुळच्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच सोलापूर विधानपरिषदचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली व संघाच्या संचालक मडंळाच्या उपस्थितीत झाले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि गोकुळने दूध संकलनाचे कार्यक्षेत्र हे कोल्हापूर जिल्ह्यापूरतेच मर्यादित न ठेवता शेजारील सिंधुदुर्ग,बेळगाव,सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यात देखील दूध संकलन करण्यास सुरूवात केलेली आहे. . गोकुळचा सोलापूर जिल्ह्यातील चौथा व मंगळवेढा तालुक्यातील पहिला बल्क कुलरचे आज उद्घाटन केले/ उत्तम गुणवत्तेमुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मुंबई,पुणे,कोल्हापूर सांगली सातारा,बेळगाव तसेच कोकण विभागामध्ये दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोकुळ दूध नजीकच्या काळात महाराष्ट्राच्या उर्वरित भागाबरोबरच इतर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा गोकुळचा मानस आहे.सध्या १३ ते १४ लाख लिटर्स दूध संकलन करणारा गोकुळ २० लाख लिटर्स उद्दिष्ट निश्चितच साध्य करेल आणि दूध विक्रीचे क्षेत्र वाढल्याने दूध विक्रीमध्ये वाढ होऊन दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देता येईल असे श्री. पाटील यांनी सांगीतले.
सोलापूर विधानपरिषद चे माजी आमदार मा प्रशांत परिचारक, गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), संत दामाजीपंथ सहकारी साखर कारखाना चेअरमन शिवानंद पाटील ,व्हा चेअरमन तानाजीभाऊ खरात,गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील,नंदकुमार ढेंगे,विजयसिंह मोरे,बाळासो खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, माजी पंचायत सदस्य सुनील पाटील,वीरशैव बँकचे संचालक अनिल सोलापुरे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, सहा.व्यवस्थापक बी.आर.पाटील, भानुदास पाटील उपस्थित होते.