इचलकरंजी : लखन जाधव
दि.१५ : डीकेटीईमध्ये रुबीस्केपयांच्या संयुक्त विद्यमानाने अर्टिफिशिएल इंटेलिजीएन्स, डाटा सायन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स् मधील सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र चालू झाले आहे. रुबीस्केप ही भारतातील पहीली युनिफाईड डेटा सायन्स प्लॅटफॉर्म कंपनी आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स चे उद्घाटन रुबीस्केप इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रशांत पानसरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डीकेटीईच्या सचिव डॉ सपना आवाडे, प्र. संचालक डॉ सौ. एल.एस. आडमुठे प्रमुख उपस्थित होत्या.
डीकेटीईमध्ये साकारत असलेले रुबीस्केप हे अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्स असून यामध्ये रुबीस्केप ए-आय-डाटा सायन्स आणि आयओटी तंत्रज्ञान मधील सॉफटवेअर टूल्स आहेत जे भारतात बनविले गेले आहे. जेे क्लाउड आणि ओपन सोर्स तंत्रज्ञान च्या प्लॅटफॉर्म वर चालतात. तसेच हे सेंटर ऑफ एक्सलन्स इन कॉम्प्युटर, सॉफटवेअर क्षेत्रात तंत्रज्ञान आर अॅण्ड डी, ज्ञान निर्मिती, सक्षमता विकास, इन्व्होवेशन इन्क्युबीएशन आणि संशोधन यावर लक्ष केंद्रीत करेल.
या प्रसंगी डॉ प्रशांत पानसरे म्हणाले भारतीय महत्चाकांक्षी डेटा सायंटीस्टना त्यांच्या करिअरच्या मार्गात सक्षम बनवून डीकेटीई सोबत भागिदारी करण्यास रुबीस्केप प्रा. लि., पुणे ही कंपनी उत्सुक आहे तसेच डीकेटीई मध्ये सुरु असलेले सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय-डीएस,आयओटी हे भविष्यातील कौशल्य, नाविण्यपुर्ण संस्कृती, उत्पादन इन्क्युबीएशन आणि स्टार्ट अप चा वेग वाढविणे हे उद्दीष्टेय आहे व ते सीएसई, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांसाठी प्रभावी साधन होणार आहे.
डीकेटीईच्या सचिव डॉ सौ सपना आवाडे यांनी डीकेटीईच्या प्रगतीचा आढावा घेत, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यास डीकेटीई नेहमीच अग्रेसर राहील.
डीकेटीईमधील या सेंटर ऑफ एक्सलन्समुळे अॅनेलिटीक स्कील डेव्हलप करण्यावर भर दिला असून त्याचा उपयोग प्रोग्रॅमिंग स्किल आत्मसात करुन दिलेल्या प्रॉबलेमवर सोल्यूशन शोधण्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे असे मत व्यक्त केले
प्र संचालिका डॉ एल एस आडमुठे यांनी या सेंटरमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना डाटासायन्स टॅलेंटपूल विकसीत करण्याचा प्रयत्न करेल जे उदयोगाच्या उदयोन्मुख आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक साधन होणार आहे.
सदर कार्यक्रमास उपसंचालक प्रा डॉ यु.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, विभागप्रमुख डॉ डी.व्ही. कोदवडे, डॉ व्ही.आर नाईक यांच्यासह प्राध्यपक विद्यार्थी व रुबीस्केप चे तसेच इतर इंडस्ट्रीमधील मान्यवर उपस्थित होते.