इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २३ बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने इचलकरंजी मधील इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर यांचा मेळावा इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कार्यक्रमाला बिरला शक्ती सिमेंट चे नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख, रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी, टेक्निकल इंचार्ज आशिष मांडे, सेल्स प्रमोटर नितीन धूत, ब्रँच मॅनेजर जयवंत लोखंडे, असि. मॅनेजर शादाब शिलेदार सेल्स ऑफिसर दिपक सावंत, अनिल भंगे, क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असो. अध्यक्ष विवेक सावंत, बिल्डर असोसिएशन चे व्हाईस प्रेसिडेंट फैयाज गैबान यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी केले. त्यानंतर प्रास्ताविकपर भाषणात नितीन धूत यांनी आपण सर्वांनी कंपनीला दिलेली साथ व कंपनीवर दाखवलेला विश्वास बहुमूल्य आहे व इथून पुढच्या काळातही हा विश्वास व आपली साथ कायम ठेवावी.
बिरला शक्ती सिमेंट चे टेक्निकल इंचार्ज आशिष मांडे यांनी बिरला शक्ती सिमेंट विषयी माहिती देत उत्पादनाच्या तांत्रिक बाबी त्याचबरोबर गुणवत्तेची व बिरला शक्ती पी पी सी सिमेंट इकोफ्रेंडली असल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रेजेंटेशन द्वारे दिली.
इचलकरंजी चे आर्किटेक्ट मा श्री विठ्ठल तोडकर यांना ‘आयकॉन ऑफ एशिया’ या पुरस्काराने आणि आर्किटेक्ट मा श्री महांतेश कोक्कळकी यांना ‘बेस्ट इंटेरिअर डिझायनर’ या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल यांचा बिरला शक्ती सिमेंट च्या वतीने नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांच्या शुभहस्ते फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे आभार रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी यांनी मानले. सदर प्रसंगी इचलकरंजी व परिसरामधील २०० हून अधिक इंजिनिअर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स, बिल्डर उपस्थित होते.