इचलकरंजी :विजय मकोटे
दि. १४ नोव्हेबर :बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर, क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट्स, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आर्किटेक्ट, इंजिनियर्स व बिल्डर्स डे च्या निमित्ताने ‘कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री टर्निंग वेस्ट टू वेल्थ’ या विषयावर इंजि. सुधीर हांजे, कोल्हापूर यांची कार्यशाळा व बांधकाम क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांना पुरस्कार वितरण सोहळा रोटरी मानव सेवा केंद्र, इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त मा श्री सुधाकर देशमुख हे होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत असो. ऑफ इंजि. अँड आर्कि. प्रेसिडेंट इंजि. विवेक सावंत यांनी केले. प्रास्तविक करताना बिल्डर्स असो. चेअरमन नितीन धूत यांनी चार ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला. इंजी. रमेश मर्दा यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.
बांधकाम क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवणारे इचलकरंजीचे आर्कि. श्री. महांतेश कोक्कळकी, आर्कि. श्री. विठ्ठल तोडकर यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बांधकाम क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त मा श्री सुधाकर देशमुख यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सेंट्रिंग विभाग राजू घुणके, अंकुश मोहिते, बांधकाम विभाग हनुमान धोत्रे, गिलावा विभाग मुरलीधर पाटील, सुतारकाम विभाग कानाराम सुतार, इंटर्नल पेंटिंग विभाग राजकरण शर्मा, एक्स्टर्नल पेंटिंग विभाग विठ्ठल कदम, प्लंबिंग विभाग कुबेर लोहार, इलेक्ट्रिशियन विभाग राजू सवाईराम, फरशीकाम विभाग रमेश प्रजापती, वॉटर प्रूफिंग विभाग युनुस गवंडी, फॅब्रिकेशन विभाग उमरफारूक दाढीवाले आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांनी आपले विचार मांडताना या चार ही संस्थांकडून सर्वसामान्य बांधकाम कामगार वर्गास देण्यात येणारा हा पुरस्कार नवीन बांधकाम कामगारांना नक्कीच प्रोत्साहित करेल. असे गौरवोद्गार काढले. तत्पूर्वी इंजि. सुधीर हांजे यांनी आपल्या कार्यशाळेमध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधून निर्माण होणाऱ्या वेस्टचा नवीन बांधकामामध्ये वापर कसा करता येईल व त्या गोष्टीचा पर्यावरणाला व बिल्डर्स ना कश्याप्रकारे फायदा होऊ शकतो याची अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच पाश्चात्य देशांमध्ये सक्रीय असणाऱ्या कार्बन क्रेडीट विषयी माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन रोटरी क्लब सेंट्रल प्रेसिडेंट रो. अशोक जैन यांनी केले.
सदर प्रसंगी फैयाज गैबान, जहीर सौदागर, राजेंद्र खंडेराजुरे, शितल काजवे, दिलीप पटेल, अरुण चौगुले, मोहित गांधी, श्रीकांत राठी, पन्नालाल डाळ्या, सय्यद गफारी, मोहन सातपुते, डॉ. किरण पवार, विक्रम जैन, राम मुंदडा यांच्यासह चार ही संस्थांचे २५० हून अधिक इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स, बिल्डर्स, डेव्हलपर्स व सभासद उपस्थित होते.