मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंचा राष्ट्रावादीला दणका; भिवंडीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द

भिवंडी:प्रतिनिधि

दि:२७:जुन:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पुढील सहा वर्षांसाठी ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे. 

या १८ बंडखोर नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०३१ पर्यंत निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे हा त्या १८ बंडखोर नगरसेवकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश झुगारुन कॉंग्रेसच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. कॉंग्रेसच्या १८ नगरसेवकांनी विरोधी पक्षातील चार नगरसेवक असलेल्या कोनार्क विकास आघाडीला मतदान करुन त्यांना महापौर निवडून आणला. तर बंडखोर नगरसेवकांमधील एकाला उपमहापौरपद देण्यात आलं होतं. त्या

या बंडखोरीविरोधात कोकण भवन आयुक्तांकडे कॉंग्रेसकडून याचिका दाखल करण्यात आली होती. आता हा निकाल कॉंग्रेसच्या बाजूने लागल्याने 18 बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

भिवंडी