इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:३०:जुन:श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल जुनियर कॉलेज इचलकरंजी येथे सक्षम शाळा सुदृढ शाळा उपक्रमांतर्गत मार्गदर्शन वर्ग भरवण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर होत्या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक उपप्राचार्य आर एस पाटील यांनी केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुळीक साहेब माजी मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली नायकवडी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक मुळीक साहेब म्हणाले मुलींनी आपल्याबरोबर घडत असलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत पालक शिक्षक पोलीस यांना माहिती द्यावी. योग्य वेळी उपाय केला तर भविष्यात येणारे गंभीर प्रसंग टाळता येतात. मुलींनी आपले वर्तन चांगले ठेवल्यास त्यांना अडचणी येत नाहीत. मोबाईलचा अतिवापर अनेक समस्यांचे मूळ आहे. मुलींनी आपल्या वरती होणाऱ्या अन्यायासाठी 112 नंबर डायल करावा छेड काढणे पाठलाग करणे कॉमेंट्स करणे असे प्रसंग घडत असतील तर 112 नंबर डायल करून पोलिसांना माहिती द्यावी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल रात्रीच्या वेळी महिलांना प्रवास करावयाचा असेल तर 112 नंबर डायल करून पोलिसांची मदत घ्यावी इचलकरंजी मध्ये कॅफेचे प्रमाण वाढले आहे यामध्ये अनेक गैरमार्गाचा अवलंब केला जात आहे अशा गोष्टींच्या पासून मुलींनी दूर राहावे.
यावेळी माझी उपमुख्याध्यापिका वैशाली नायकवडी मॅडम त्याने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले मुलींनी कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम असले पाहिजे अडचणीच्या वेळी कणखरपणे उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी क्रीडा शिक्षक प्रा.शेखर शहा यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले मुलींना सक्षम व सुदृढ बनवण्यासाठी आमच्या प्रशालेत प्रत्यक्ष शनिवारी कराटे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.