बिल्डर्स असो.ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी फैयाज गैबान

इचलकरंजी -विजय मकोटे 
दि .०२   देशभरातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान, व्हाईस चेअरमनपदी शितल काजवे, सेक्रेटरीपदी राजेंद्र शिंत्रे, जॉ. सेक्रेटरीपदी दिलीप पटेल आणि ट्रेझररपदी पुंडलिक जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
इचलकरंजी सेंटरचे मावळते चेअरमन नितीन धुत यांच्या अध्यक्षतेखाली असोशिएशनची बैठक पार पडली. त्यामध्ये सन २०२४-२०२५ या सालासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया ही देशपातळीवर कार्यरत संस्था असून देशभरातील बांधकाम क्षेत्रातील कॉन्ट्रॅक्टर, गव्हमेंट कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, बिल्डर्स, आरएमसी, फॅब्रिकेटर्स, सॅनिटर आदींची शिखर संस्था म्हणून काम करते. या असोशिएशनच्या इचलकरंजी सेंटरच्या पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सन 2024 ते 2026 सालासाठीची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. नुतन कार्यकारीणीमध्ये प्रताप साळुंखे, मोहन सातपुते, तानाजी हराळे, भगवान कांबुरे, पन्नालाल डाळ्या, शिवाजी पोवार, विकास चंगेडीया, सुहास अकिवाटे, महांतेश कोकळकी, प्रल्हाद माने, स्वप्निल शहा, शिवकुमार हिराणी, श्रीकांत लास्कर, रमेश मर्दा, राजेंद्र उपाध्ये, महेश महाजन, राजेंद्र खंडेराजुरे, सुधीर लाटकर, संजय रुग्गे यांचीही निवड करण्यात आली आहे.
बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे आजमितीला १४० पॅटर्न मेंबर्स आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी कार्यरत असणारी ही सर्वात मोठी संस्था असून २०० पॅटर्न मेंबर्स करण्याचा मानस असल्याचे नुतन चेअरमन फैयाज गैबान यांनी यावेळी सांगितले. निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.