संजय घोडावत इन्स्टिट्यूटला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५” पुरस्कार*

कोल्हापूर :रेणू पोवर 

दि .१५:शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे या नामवंत संस्थेला एक मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नवभारत एज्युकेशन समिट २०२५ मध्ये संस्थेला “बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर” हा मानाचा मानला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार आणि उत्तर प्रदेश राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इन्स्टिट्यूट चे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी पुरस्कार स्वीकारला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातील उत्तुंग कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग संलग्न अभ्यासक्रमांची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने केलेल्या कामाचे हे मोठे गौरवचिन्ह ठरले आहे.

“पुरस्कार स्वीकारताना इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. गिरी म्हणाले सर्व विभागाचे विभागप्रमुख, सर्व विषयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अविरत परिश्रम आणि एकसंघ प्रयत्न आहेत. संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, स्टार्टअप्ससाठी पोषक वातावरण, आणि नवनवीन प्रयोगशील उपक्रमांची रचना करून दिली आहे. म्हणून हे इन्स्टिट्यूट आदर्श शिक्षणसंस्था म्हणून स्थान निर्माण करत आहे.”

संजय घोडावत इन्स्टिट्यूटने मिळवलेल्या या यशाने कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छा चा वर्षा होत आहे.संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, यांनी या पुरस्काराबद्दल सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, भविष्यात आणखी उच्च शिखरे गाठण्याचा शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×