गणपतराव पाटील यांना ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

शिरोळ :राम आवळे 

दि.५ :एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे यांच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा ‘पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार’ श्री दत्त कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव (दादा) पाटील यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील फिरोदिया सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. या कार्यक्रमात श्री. सिद्धेश कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

गणपतराव पाटील यांनी शिरोळ तालुका व परिसरातील क्षारपड जमीन सुपीक करण्यासाठी केलेले दीर्घकाळचे प्रयत्न पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुरस्कार देण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया गेली १७ वर्षे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असून दरवर्षी ‘पर्यावरण भूषण’ व ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कार देऊन संस्था व व्यक्तींचा सन्मान केला जातो. या संदर्भातील माहिती अध्यक्ष आमोद घमंडे, सचिव गणेश शिरोडे आणि खजिनदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×