इचलकरंजी महापालिकेचे बाजीराव कांबळे झाले ‘डॉ. बाजीराव कांबळे’;

मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, दिल्लीकडून मानद डॉक्टरेट

इचलकरंजी: अन्वर मुल्ला 

दि १५ जुलै:इचलकरंजी महानगरपालिकेतील अष्टपैलू शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली असून त्यांच्या अभियांत्रिकी व पर्यावरण क्षेत्रातील योगदानाची ही थेट पावती आहे.

बाजीराव कांबळे गेली दोन दशके पाणीपुरवठा विभागात कार्यरत असून, मागील दोन वर्षांपासून बांधकाम विभागाचीही जबाबदारी पार पाडत आहेत. प्रशासनातील जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविका व पदवीही पूर्ण केली आहे. अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची खंत कृतीतून पूर्ण करणारे कांबळे यांचे कार्य महत्त्वाचे आहे.महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजासोबतच अभियांत्रिकी व पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेत मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.

या निमित्ताने आज, मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते व अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्ढेकर, सहा. आयुक्त विद्या कदम व विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाजीराव कांबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, सादिक गजबर, नंदु माळगे, हर्ष माळगे, आकाश माने, प्रणव कांबळे, रोहन कुरने, जगन्नाथ सोलनकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.