स्व. सुधाकरराव मणेरे यांना सौ. कुसुमताई शिक्षण संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी 

दि. १५ जुलै: श्री. डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी या संस्थांचे संस्थापक स्वर्गीय सुधाकररावजी मणेरेसो यांचे रविवार, दि. १३ जुलै २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संस्थेवर शोककळा पसरली असून, मंगळवार, दि. १५ जुलै रोजी संस्थेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या श्रद्धांजली सभेस संस्थेचे समन्वयक मा. अशोक वसगडे सर, मणेरे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मंगसुळे मॅडम, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. ऐनापूरे मॅडम, कॉलेज विभागप्रमुख सौ. चौगुले मॅडम, तसेच शिक्षकवृंदांपैकी सौ. करपे मॅडम, कु. शिंदे मॅडम, कु. नराटे मॅडम व कु. उपाध्ये मॅडम यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

तसेच उपस्थित पालक प्रतिनिधी श्री. जीवन चावरे व श्री. जाधव सर, शालेय विद्यार्थी, रिक्षा चालक व इतर पालकांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत, “काकांचा (मामांचा) प्रेमळ, कनवाळू व दयाळू स्वभाव सदैव आठवणीत राहील,” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली.अत्यंत भावनिक आणि पावसाळी वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात निसर्गही जणू अश्रू ढाळत सहभाग घेत असल्याचे उपस्थितांनी अनुभवले.कार्यक्रमाचे नेतृत्व संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे यांनी केले. त्यांनी स्व. सुधाकरराव मणेरे यांचे छायाचित्र पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.या वेळी संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.