जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वाटद खंडाळा M.I.D.C. परिसर दौरा व समन्वय बैठक, ग्रामस्थांसोबत थेट संवाद

रत्नागिरी | २३ जुलै २०२५

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी वाटद खंडाळा M.I.D.C. संदर्भात जयगड पोलीस ठाण्यात समन्वय बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी वाटद गाव व वाटद खंडाळा M.I.D.C. परिसराला भेट देत तेथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

या बैठकीदरम्यान रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अश्वनाथ खेडकर, तसेच जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. कुलदीप पाटील हेही उपस्थित होते.

 

बैठकीत ग्रामस्थांनी आपले विविध मुद्दे व अडचणी स्पष्टपणे मांडल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी लोकांच्या भावना जाणून घेतल्या व प्रशासनाच्या वतीने विकासाची दिशा स्पष्ट केली. उपस्थित प्रतिनिधींनी सांगितले की, “आम्ही स्वतः प्रत्येक पाड्याला भेट दिली असून, गावागावात जाऊन लोकांशी थेट संवाद साधला आहे. विकासासाठी M.I.D.C. कशी गरजेची आहे, हे देखील लोकांसमोर स्पष्ट केले.”

सदर दौऱ्याचा उद्देश स्थानिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक समन्वय साधणे, नागरिकांचे मुद्दे ऐकून घेणे व विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!